कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाच्या आरोग्यविषयक उपक्रमांवर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रम यशस्वीपणे राबविला आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने, निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भर दिला आहे. कर्करोग, मधुमेह, अॅनिमिया आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर व सामान्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत.
कर्करोगापासून बचाव आणि प्रतिबंध
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी नागरिक खालील उपाययोजना करू शकतात:
1. तंबाखू आणि मद्यपान टाळा: कर्करोगाचे मुख्य कारण असणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे.
2. सक्रिय राहा आणि वजन नियंत्रित ठेवा: नियमित शारीरिक व्यायाम करा आणि शरीराचे वजन संतुलित ठेवा.
3. निरोगी आहार: आहारात फळे, पालेभाज्या आणि कडधान्यांचे प्रमाण वाढवा.
4. लसीकरण: हिपॅटायटिस-बी (Hepatitis-B) ची लस टोचून घ्या.
5. नियमित तपासणी: कर्करोगाच्या प्रारंभिक निदानासाठी व स्तन कर्करोगाच्या बचावासाठी स्व-स्तन परीक्षण आणि नियमित वैद्यकीय तपासणी करा.
मधुमेह: नियंत्रणाचे सोपे उपाय
मधुमेह (Diabetes) नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे आणि संतुलित आहार घेणे हे प्राथमिक उपचार आहेत. मधुमेहाची सामान्य लक्षणे म्हणजे वारंवार लघवी होणे, अचानक वजन घटणे, वारंवार तहान लागल्यासारखं वाटणे आणि अशक्तपणा जाणवणे.
नियंत्रणासाठी महत्त्वाचे:
1. व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि इन्सुलिनच्या पातळीत सुधारणा होते.
2. जीवनशैली: तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आणि मद्यपान टाळावे.
3. काळजी: रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आणि डोळे व पायांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
अॅनिमिया (रक्तक्षय) प्रतिबंधनिरोगी शरीर आणि तल्लख बुद्धीसाठी अॅनिमिया (Anemia) ला प्रतिबंध करणे गरजेचे आहे. अॅनिमिया टाळण्यासाठी लोहयुक्त (आयर्न) पदार्थांचे सेवन करा.
1. आहार: कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या (पालक, मेथी), फळे, दूध, दही, पनीर, तसेच मांसाहारींसाठी अंडी, मांस व मासे यांचा आहारात समावेश करा.
2. लोह शोषण: आहारात लिंबू, आवळा, पेरू यांसारख्या आंबट फळांचा समावेश करा, जे लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात.
3. पूरक औषधे: वयोगटानुसार आरोग्य संस्थांमार्फत आयएफए (IFA) सिरप/गोळ्या आणि अल्बेण्डाजोल गोळी (जंतनाशक) निर्धारित डोसमध्ये घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः गर्भवती आणि स्तनदा महिलांनी लाल आयएफए गोळी दररोज घ्यावी.
4. उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रण
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवल्यास जीवनातील आनंद वाढतो. यासाठी ५ स्मार्ट उपाय आहेत:
मीठ = दिवसातून १ चमचापेक्षा कमी मिठाचे सेवन करा.
5. संतुलित आहार: हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करा.
6. व्यायाम: रोज किमान ३० मिनिटे चालणे, नृत्य करणे किंवा योगासने करा.
7. धूम्रपान/मद्यपान टाळा: धूम्रपान आणि मद्यपानाला पूर्णपणे ‘नाही’ म्हणा.
8. वजन नियंत्रित ठेवा: नियमित संतुलित आहार आणि व्यायामाने वजन नियंत्रित ठेवा.
9. आरोग्य संस्थांमार्फत सल्ला: ३० वर्षांवरील व्यक्तींनी आपली वैद्यकीय तपासणी नियमितपणे करून घ्यावी. उच्च रक्तदाब टोखण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी सल्लामसलत, रक्तदाबाची नियमित चाचणी.
“स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान
अभियानातील उपक्रम सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा
1. रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी 67392
2. स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी – 103708
3. सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी 42173
अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी केले आहे