अतिग्रे ( प्रतिनिधी ) : संजय घोडावत विद्यापीठातील वाणिज्य विभागातर्फे 11 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना व्यापार आणि उद्योगाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी स्टार बीझ बाजार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन आणि विपणन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असून यासाठी धरती बीज सेंच एनर्जी प्रायोजक आहे. या महोत्सवात विद्यार्थी त्यांच्या सर्जनशील व्यवसायिक कल्पना मार्केटिंग स्ट्रॅटजी उद्योगशीलतेची कौशल्य मांडणार आहेत. घोडा विद्यापीठातील फूड कोर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात सर्व ग्राहक, पालक, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर डॉ. उद्धव भोसले, वाणिज्य विभागाचे डीन, विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.