मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे लग्ग्न अखेर पार पडलं. सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. मुंबईत दोघेही कुटुंबीय व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले. सोनाक्षीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा लग्नात अत्यंत जबरदस्त असा लूक दिसत होता. सोनाक्षी सिन्हा हिने सिव्हील मॅरेजच्या वेळी अत्यंत खास अशी साडी घातली होती. सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल 44 वर्षांपूर्वीची साडी घातली होती..

सोनाक्षी सिन्हाने घातलेली ही साडी तिच्या आईची आहे. विशेष म्हणजे ही साडी सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा यांनी त्यांच्या लग्नात घातली होती. याच साडीवर पूनम सिन्हा यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत सातफेरे घेतले होते. त्यानंतर पार्टीमध्येही सोनाक्षी सिन्हा हिने लाल रंगाची अत्यंत खास अशी साडी घातली. सोनाक्षीने घातलेली ही साडी अत्यंत महागडी आहे. सोनाक्षी सिन्हाने घातलेली ही साडी 78,000 हजारांची आहे. या साडीसोबतच तिने अत्यंत खास असा मेकअपही केला.हेच नाही तर सोनाक्षी सिन्हा हिने लग्नामध्ये घातलेली दागिने देखील तिच्या आईचेच आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे लग्नामध्ये उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अगोदरच्या कोणत्याही कार्यक्रमात लव आणि कुश हे सहभागी झाले नव्हते. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील लव आणि कुशचे काही फोटो व्हायरल होत आहेत.बहिणीच्या लग्नात लव आणि कुश सहभागी झाले. मात्र, ते बहिणीच्या आनंदात नक्कीच सहभागी नव्हते. त्यांनी भावाच्या कोणत्याच विधी देखील केल्या नाहीत. सोनाक्षी सिन्हा हिच्यावर लव आणि कुश नाराज असल्याची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.