मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजपमध्ये २०१९ मध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रे दरम्यानही हा दुरावा निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. परंतु खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले की, मंदिरांचा विषय असाच आहे मंदिरं उघडणं हे काँग्रेस, राष्ट्रवादीला चालणार नाही. मग त्यांना चालणार नाही का? मग खुर्चीसाठी मी देखील उघडणार नाही. दुसरं काही कारणच नाही मंदिरं न उघडण्याचं. त्यामुळे असं खुर्चीवर प्रेम असणारे जे उद्धव ठाकरे आहेत, ते स्वत:च्या पक्षाचं काय नुकसान झाले.

संजय राऊत व्यतिरिक्त कुणी बोलताना दिसतयं का? आमचे परममित्र दिवाकर रावते कुठे गेले? आमचे अतिपरममित्र खूप दोस्ती आहे, असे आमचे रामदास कदम कुठे गेले? अनिल देसाई, सुभाष देसाई, रवि वायकर कुठे गेले? कुठे गेलेत सगळेजण?, असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.