कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे आमदार निलेश लंके यांना शिवांजनी फौंडेशन कोल्हापूरतर्फे ‘जाणता आमदार’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. फौंडेशनच्या अध्यक्षा सौ सरिता अजित पवार यांनी आमदार लंके यांनी हि माहिती दिली.

कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील आमदार निलेश लंके यांनी अद्वितीय काम केले आहे. हजारो कोरोना रुग्णांना त्यांच्या या कार्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार लंके यांच्या या कार्यामुळे संपूर्ण राज्यात ते एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आले आहेत. याच कार्याची दाखल घेऊन कोल्हापूरमधील शिवांजनी फौंडेशनतर्फे यंदा छत्रपती शाहू जयंतीनिमित्त त्यांना ‘जाणता आमदार’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. याबाबत फौंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार यांनी स्वतः आमदार लंके यांना संपर्क करून याची माहिती दिली आहे. लंके यांच्या कार्याचा गौरव करणारे शिवांजनी फौंडेशन ही कोल्हापूरमधील पहिली संस्था आहे. सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गेल्या १५ वर्षांपासून हि संस्था गौरव करत आहे. संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हि संस्था कार्यरत आहे.