कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या संभाव्य हद्दवाढीतून हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव ही दोन गावे वगळावीत. अशा मागणीचे निवेदन माजी आमदार आणि गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शिरोली पुलाची आणि नागाव ग्रामस्थांचा हद्दवाडीत समाविष्ट होण्यास विरोध आहे. तसेच शिरोली गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि या दोन्ही गावात औद्योगिक वसाहत असल्याने अपुऱ्या निधीअभावी विकासकामांसाठी ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. यासाठी शिरोलीसाठी स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी करण्यात आली आहे. याचा विचार करुन दोन्ही गावे हद्दवाढीतून वगळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिल असल्याचे डॉ. मिणचेकर यांनी सांगितले.