हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा प्रचार दौरा हातकणंगले तालुक्यातील शिरोली, हेरले, माले, मुडशिंगी, अतिग्रे गावात झाला. यावेळी त्यांच्या सोबत आमदार राजुबाबा आवळे, शिवसेनेचे माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर, माजी आमदार राजू आवळे यांची उपस्थिती होती.

यावेळी अतिग्रे येथे प्रचार रॅलीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाच्या प्रमुखांनी जोरदार स्वागत करून घोषणा देऊन स्वागत केले. तसेच सत्यजीत पाटील यांना आपला पाठिंबा देऊन अतिग्रे गावातून मोठे मताधिक्य देऊन निवडून आणू असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी सत्यजित पाटील सरुडकर यांनी, ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेतले. त्यांनतर उपस्थित कार्यकर्त्यांशी विकास योजना संदर्भात आडीआडचणी जाणून घेतल्या. या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिग्रे गावाने साथ द्यावी, असे आवाहन केले. आपण निवडून आल्यानंतर शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या आडचनी प्राधान्य क्रमाने सोडवून अतिग्रे गावच्या विकासासाठी मोठे योगदान देऊ अशी हमी दिली.

यावेळी हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम, योगेश चव्हाण, माजी जिल्हापरिषद सदस्य महेश चव्हाण शिरोली, शिवसेना जिल्हा प्रमुख उध्दव ठाकरे गट संजय चौगुले आदी प्रमुख त्यांच्यासोबत होते.