टोप (प्रतिनिधी) : सादळे – मादळे (ता. करवीर) येथील केंट क्लब रिसार्टमध्ये अज्ञात व्यक्तीने ५१ हजाराच्या साहित्याची चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी  भगवान भाऊ पाटील यांनी शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रिसार्टमधील १४ हजार किंमतीचे कॅरिएर कंपनीचा १ टनचा एसी, १० हजार किंमतीचे ५ एच.पी.ची इलेक्ट्रीक मोटर, २० हजार किंमतीची बोअरचे सब मर्सीबल पंप, ७ हजार किंमतीचे जिमचे साहित्य असे एकूण ५१ हजार रूपये किंमतीचे साहित्य लंपास केले. चोरट्यांनी परिसराचा अंदाज घेवून ही चोरी केली असल्याचे बोलले जात आहे.