खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवसेना “दक्षिण” कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या सीमा मर्यादित न ठेवता कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे ध्येय आम्ही ठेवले आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघासह दक्षिण मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीनुसार विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून शहराचे दक्षिणोत्तर विकास पर्व सुरु करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात दक्षिण विधानसभा मतदारसंघ मुलभूत सोयी सुविधा व इतर विकास कामांपासून वंचित राहिला आहे. विकास पर्वाचा नवीन चेहरा म्हणून संपूर्ण राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडे बघत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दक्षिण मतदारसंघास कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सुरु केलेल्या दक्षिणोत्तर विकासपर्वा मुळेच दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनता महायुती उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे प्रा.संजय मंडलिक यांना या मतदारसंघातून निश्चितच मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज कळंबा येथील अमृतसिद्धी हॉल येथे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, दक्षिण विधानसभा मतदारसंघ विकासाची आस असणारा भाग आहे. याठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेने विकासाला साद घातली आहे. या मतदारसंघातील राजकीय टोकाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहत आहे. आजच्या मेळाव्याला हजारो महिला व कार्यकर्त्यांची हजेरी पाहता महायुती शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख उदय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, अॅड.वीरेंद्र मंडलिक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, मा.नगरसेवक अॅड. अमोल माने, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख अमरजा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी युवासेनेचे पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, अनुसूचित जाती जमाती शहरप्रमुख प्रभू गायकवाड, तालुकाप्रमुख शंभू मोरे, प्रकाश सूर्यवंशी, मारुती खडके, युवती सेना शहरप्रमुख तेजस्विनी घाटगे, नम्रता भोसले, निवेदिता तोरस्कर, सचिन पाटील, सचिन संकपाळ, अनिल पाटील, जयवंत चौगले, संतोष लोहार, स्वप्नील ढवाण, अनिकेत मोरबाळे, शशिकांत मगदूम, आनंदा पाटील, विठ्ठल मगदूम, अनिल चव्हाण, दत्तात्रय शिंदे, गोरखनाथ वाडकर, सर्जेराव पाटील, सतीश आडसुळे, हर्षद चौगुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.