मुंबई (प्रतिनिधी) : अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ ही खलनायकी व्यक्त्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणारा ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ 16 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
यावेळी राहुल देव म्हणाले की, आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी क्रूरकर्मा ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयीपर्यंतचे बदल करावे लागतात.
काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होते. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो, तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लुक्सचा, त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली असल्याचे देव यांनी सांगितले.
तसेच या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर,भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे कलाकार दिसणार