कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील तिढा सुटलेला नाही. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हा पेच आणखी वाढला आहे.

लाईव्ह मराठीने माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधत राहुल आवाडे यांच्या भुमिकेबाबत माहिती घेतली असता सध्या त्यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ट नेत्यांसोबत सल्लामसलती सुरु असून, यातून काही ही निर्णय आला तरी आम्ही हातकणंगले मतदार संघातून लढणार हे निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.

हातात मशाल असणार की नाही ? इतर कोणता पक्षाला जवळ करणार का ? की अपक्ष लढत होणार याबाबत आताच सांगता येणार नाही. मात्र असतील तर सोबत नसतील तर शिवाय यावर राहुल आवाडे ठाम असल्याचं त्यांच्या निकटवर्तींनी म्हटलं आहे. त्यामुळे कोल्हापूर नंतर आता हातकणंगले लोकसभा मतदार संघाची लढत ही तिरंगी होणार हे स्पष्ट झालं आहे.

त्याचबरोबर सध्याचे एकनाथ शिंदे गटाचे हातकणंगले उमेदवार देखील बदलले जाण्याची शक्यता आता राजकीय वर्तूळातून वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होणार का यावर ? येत्या काही तासात पडदा पडणार आहे.