कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहेत. कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा २८ एप्रिल रोजी तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील इतर मंत्रीही उपस्थित राहणार असल्यामुळे कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार असल्याचेही क्षीरसागर म्हणाले.