अमरावती – सध्या लोकसभेच रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर हल्लाबोल करायची संधी सोडत नाहीयत. अशातच अमरावती लोकसभा मतदान संघ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत माजी कृषिमंत्री शरद पवारांनी महायुती उमेदवार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन् नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही असे म्हणत शरद पवारांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार..?

आज या ठिकाणी मी आलोय ती एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजिनक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे. अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे.शरद पवार म्हणाले .. आता यावर नवनीत राणा काय उत्तर देतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.