लाईव्ह मराठी प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) जो नेता आपल्या कुटुंबाचा झाला नाही तो देशाचा काय होणार ? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सोनिया दुहान यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या निकालावरुन आता शरद पवार गट आक्रमक झाला असून, ही लढाई सुरुच राहणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत बोलताना दुहान यांनी म्हटलं आहे की, देशातील जनतेला माहिती आहे की, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे. त्यामुळे या निकालावरुन आम्हाला फारसा फरक पडत नाही. मात्र समाजासाठी काम करत असताना एखादा व्यक्ती आपले कूटूंब, नाती, यांना सांभाळू शकत नाही. अशा नेत्यांकडून इतरांनी अपेक्षाच ठेवणं चुकीचं असल्याचं ही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, निवडणूक आयोगाने चोरांची चोरी वैध ठरवायला सुरुवात केली आहे. अशा निर्णयांमुळे लोकशाही नष्ट होते.