कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पिसे यांच्यातर्फे रिंगरोड फुलेवाडी परिसरातील गरजू एक हजार कुटुंबाना प्रत्येकी पाच किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले. यावेळी निचितेनगर, बिड़ी कॉलनी, न्यू कणेरकर नगर, लक्मीबाई साळोखे नगर, दत्त कॉलनी, बोंद्रे नगर परिसरातील गरजू लोकांना हे वाटप करण्यात आले.

यावेळी बालेश माजगांवकर, धीरज परदेशी, ओंकार नलवडे, सचिन वालवेकर, विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.