कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आंबर्डे येथे माझं कुंटुब, माझी जबाबदारी या मोहिमेअतंर्गत प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे.
सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणा कोरोनायोध्दा म्हणून काम करत आहे. राज्य शासनाच्या या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत प्रशासक ओतारी, ग्रामसेवक पाटोळे, पोलीस पाटील संजुबाई कांबळे, सरपंच बाबुराव कांबळे, आरोग्यसेविका दिपाली चौगले, रेखा कांबळे, आशासेविका, अंगणवाडी सेविका संजुबाई पाटील, मदतनीस भारती कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी ही सर्व यंत्रणा काम करत आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जावून ताप, सर्दी, खोकला, आॅक्सिजनचे प्रमाण तपासत आहेत. याचबरोबर कोरोनापासून बचाव करण्यासाठी जनजागृती, लोकांना मार्गदर्शन करण्याचेही उत्तम काम ही सर्व आरोग्ययंत्रणा या मोहिमेद्वारे करत आहे.