मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगुड नगरपालिकेची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. मोसमी चौगुले प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी करवीर आणि मुरगूड मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सोडत पार पडली.
या निवडणुकीमध्ये 20 नगरसेवक असणार असून प्रभाग रचनेवर आधारित ही निवडणूक असणार आहे. नुकतेच पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. आज प्रभाग सोडत जाहीर झाली, ती पुढील प्रमाणे…
प्रभाग क्रमांक 1- नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 2 – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक 3 – सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक 4 – अनुसूचित जाती पुरुष, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 5 – नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 6 – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक 7 – सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक 8 – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिल, सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक 9 – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक 10 – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण पुरुष
यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ पुजारी, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक दिगंबर परीट, माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केली.