मुरगुड (प्रतिनिधी) : मुरगूड ग्रामीण रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड उपचार केंद्राला ना. हसन मुश्रीफ फौंडेशनकडून ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स प्रदान करण्यात आली. तसेच मुरगूड शहर आणि परिसरातील कोरोना विषयी आढावा बैठक आज ना. हसन मुश्रीफ यांनी मुरगूडमध्ये घेतली.

ना. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर पुन्हा हा रोग येणार नाही, असं वाटलं होतं. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम, समारंभ, निवडणुका यामध्ये खबरदारी घेतली नाही आणि त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या लाटेत रूपांतर होण्यामध्ये झाले. आरोग्य व्यवस्था भक्कम केली नाही तर पुढच्या लाटेला फार गंभीर परी तोंड द्यावे लागेल. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला कायम असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले.

यावेळी तहसिलदार शिल्पा ठोकडे, नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी पंडित पाटील, भैय्या माने, तालुका आरोग्याधिकारी अभिजित शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, डॉ.भगवान पाटील, डॉ. अमोल पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.