पुणे (प्रतिनिधी) : शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात नुकतीच ‘मिस हेरिटेज इंडिया’ ही सौदर्यवतींची स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली. या स्पर्धेच्या मुकुटाची मानकरी मोनिका खिलानी ठरली आहे. याचे आयोजन मृणाल एंटरटेंटमेंटच्या वतीने करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये भारतातील विविध सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस हेरिटेज इंडिया, मिसेस हेरिटेज इंडिया, क्लासिक हेरिटेज इंडिया अशा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये क्लासिक हेरीटेज इंडियाचा किताब मोनिका खिलानीने पटकावला. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांनी मानाचा मुकुट डोक्यावर घालून खिलानी यांचा गौरव केला.  या स्पर्धेचे परिक्षण निर्माती पूनम शेंडे, डॉ.गौरी चव्हाण, मयुरेश डहाके, आरती बलेरी यांनी केले.