मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यातील पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीबरोबर मराठीतही परीक्षा देता येणार आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशाश्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत हे विधेयक मांडले.

या अभ्यासक्रमासाठी मराठी पुस्तके उपलब्ध झाली असून उच्च शिक्षणअभ्यासक्रम मराठीतून शिकवण्यासाठी आर्टीफीशअल इंटीलेजन्सचा वापर केला जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले त्यानुसार हा बदल करण्यात आला असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेत येतील आणि उत्तर सुद्धा दोन भाषेत लिहिण्यास परवानगी असेल.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे माहिती दिली कि, शिक्षकांनी कोणत्याही भाषेतून शिकवले तरी मुंबई आयआयटीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना तो विषय मराठीमधूनच समजणार आहे. याच सॉफ्टवेअरचा उपयोग राज्यातील सर्व पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केला जाणार आहे. मराठीमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय असून याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ होईल असा विश्वास वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.

https://studio.youtube.com/video/8SCxwjfOFgA/edit