कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडप येथे अध्यक्ष महेश जाधव यांनी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी देवस्थान समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना महेश जाधव यांनी सुचना केल्या.

यावेळी कोणत्याही कर्मचाऱ्यांनी नवरात्रात सुट्टी घेवू नये. तसेच कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या जागीच रहावे, चारही दरवाजे बंद असल्याने भाविक या गेटवरती गर्दी करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच भाविकांशी सौजन्याने वागावे, यावेळी वेगवेगळ्या सेवा देणारे सेवेकरी नसल्याने संपूर्ण नवरात्रात आपल्याला सेवा करावी लागणार आहे. तर कोणत्याही कर्मचाऱ्याने स्वतःच्या घरातील कोणालाही दर्शनासाठी घेऊन येवू नये. तसे निदर्शनास आल्यास त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपाच्या सुचना अध्यक्ष महेश जाधव यांनी दिल्या आहेत.

यावेळी बैठकीला समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव, कर्मचारी उपस्थित होते.