कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : वाढलेल्या घरपोडीच्या आणि चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी आणि एस. पी. महेंद्र पंडित यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यावर्षीची सगळ्यात मोठी कारवाई करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलं आहे.
यामध्ये सलीम महंमद शेख , जावेद मोहम्मद शेख दोघेही राहणार गंधारपाले, साहिलनगर तालुका महाड, तर तोफिक मोहम्मद शेख राहणार आर के नगर, कोल्हापूर अशा तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी एकूण 32 घरपोडी केली असल्याचं कबूल केल आहे. त्यांच्याकडून एकूण 61 तोळे 8 ग्राम सोन्याचे दागिने, चार किलो 787 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, घरपोडी करण्यास वापरले तीन वाहने आणि हत्यारे असा एकूण 67,48,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. यासंदर्भातची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.