पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल, (प्रतिनिधी) : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीर यांनी संपूर्ण मानवजातीला आणि पर्यायाने जगालाच सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. भगवान महावीर यांनी दिलेला “अहिंसा परमोधर्म” आणि “जियो और जीने दो” हा संदेश संपूर्ण मानव जातीलाच सुखसमृद्धी आणि कल्याणाकडे नेणारा आहे, असेही ते म्हणाले.

आज कागल शहरामध्ये भगवान श्री. महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सोमवार पेठ येथे मंत्री मुश्रीफ यांनी दर्शन घेतले. त्यानंतर भाषणात पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, वर्धमान महावीर यांच्या जन्माला आज २,६२३ वर्षे पूर्ण झाली. एवढ्या वर्षाच्या कालखंडानंतरसुद्धा त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान आजही मानवजातीला उपयुक्त आहे. त्यांचे हे तत्त्वज्ञान हजारो वर्षे चिरंतन राहील एवढे ते महान आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, बाबासाहेब नाईक, अर्जून नाईक, प्रशांत मेंच, अतुल कटगे, समीर मुरगूडे, महावीर अथणे, रणजीत पाटील, अजित पाटील, नविन शिबे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.