शाहुवाडी ( प्रतिनिधी ) : शाहूवाडी तालुक्यातील हरगुडेवाडी येथील माळवाडी नावाच्या शेतात काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत असताना त्या कुत्र्याच्या बरोबर असणाऱ्या गावातील दहा ते बारा कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केल्याने बिबट्या गंभीर जखमी झाला असताना कुत्र्याच्या उरण्याच्या आवाजाने गावातील तरुणांनी घटनेकडे धाव घेतली असता बिबट्यावर कुत्री हल्ला करत असल्याचे पाहून कुत्र्याच्या तावडीतून बिबट्याला सोडून जखमी बिबट्याच्या तोंडावर पोते टाकून त्याला पकडून दोरीच्या साह्याने जर बंद केल्याची घटना हरुगडेवाडी गावात घडली.

हरगुडेवाडी येथील माळवाडी येथील शेतात सातच्या सुमारास कुत्र्यांचा मोठमोठ्याला ओरडत्याला आवाज ऐकून गावातील काही तरुणांनी या शेताकडे धाव घेतली असता बिबट्यावर कुत्री हल्ला करून जखमी केले असल्याचे लक्षात येतात कुत्र्याच्या तावडीतून बिबट्याला सोडवून त्याला दोरीच्या साह्याने बांधून घेरबंद केल्याच्या घटनेची माहिती शाहूवाडी वनविभागाला दिली. शाहूवाडी वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या टीमने घटनास्थळी येऊन जेरबंद केलेला बिबट्याला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती परिसरात कळताच परिसरातील लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शाहूवाडी तालुक्यात वारंवार वन्य प्राण्यांपासून होणारे हल्ले व मानवी वस्तीतील वावर होत वाढत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.