धामोड (प्रतिनिधी) : कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले दिग्विजय श्रीपती कुंभार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली.

कुंभार यांनी स्टडीज ऑन हायड्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सिटी या विषयावर पाच वर्षे अभ्यास करून पुणे विद्यापीठास आपला प्रबंध सादर केला होता. त्यांना प्रा. डॉ. डी. के. म्हस्के, दादा पाटील, प्रा. डॉ. बाळ कांबळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. डॉ. बी. ए. पवार, प्रा. डॉ. पी. एम. दिघे यांचे मार्गदर्शन लाभले. कुंभार हे २०१२ साली सेट उतीर्ण झाले होते.