कपिलेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र,गोवा, राजस्थान,कोकण आणि अन्य राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी पहाटे कृष्णात डोणे यांनी केलेली भाकणूक केली.

श्री क्ष्रेत्र आदमापूर येथे सदगुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत जागरा दिवशी पहाटे ही भाकणुक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी ही भविष्यवाणी कथन केली. या मराठी वर्षातील ही शेवटची अन् महत्वाची भाकणुक असल्याने काय भविष्य कथन होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश मधील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

या भाकणूकीमध्ये, भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया, चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, असे म्हटले आहे.

तर देश आणि राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील, पक्षनिष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. सन २०२४ मध्ये राजकीय लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील. सिमा भागात मोठा गोंधळ होईल. गुंडाची राज्य

आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य पर ग्रहावर राहायला जाईल. बाळुमामा शेषनागाचा अवतार हाय. या गावात मी निशाण रोवलंय, माझ ठाण मांडलय. बाळूमामांचा त्रिभुवनात जयजयकार होणार. आदमापुर बाळुमामांची पवित्र भुमी हाय. या गावाचा महिमा जगात वाढेल. आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर होईल. एकीन वागा. राजकारण आणशीला, करशीला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल, मिरवेल. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचे आहे. धर्माची गादी आहे. तिला रामराम करा. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील, अशी भाकणूक करण्यात आली.