कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या सांस्कृतिक ऑलिम्पियाड कला सादरीकरण स्पर्धेत कोल्हापूरची सुकन्या ऋज्वी महेश पाटील हिने दुसरा क्रमांक पटकावला. दुबईतील ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट आणि कल्चरच्या वतीने या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते.  ‘ऋज्वी’ला कोल्हापूरच्या नर्तना स्कूल ऑफ डान्सच्या संचालिका कविता नायर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसिद्ध एज्युकेशन कौन्सलर महेश पाटील
(राजारामपुरी, कोल्हापूर) यांची ती कन्या आहे.