पंढरपूर प्रतिनिधी /

मोहोळ मतदारसंघातील सरकोली (ता.पंढरपूर) येथे असलेल्या भिमा व माण नदीच्या संगमावर असलेले ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर पर्यटनस्थळ निर्मिती संदर्भात मंदिर परिसर पाहणी व बैठक आमदार  श्री यशवंत (तात्या)माने यांच्या अध्यक्षतेखाली व गावचे सुपुत्र पुणे विभागीय सहाय्यक निबंधक डॉ.संजीवकुमार भोसले, मंत्रालय सचिव पितांबर भोसले व उप अधीक्षक अभिलेख कराड बाळासाहेब भोसले यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. यावेळी बैठकीत मंदिर पर्यटनस्थळ निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार यशवंत (तात्या) माने यांनी ग्रामस्थांना दिली.

यावेळी मारुती भोसले, सरपंच शिवाजी भोसले,भास्कर भोसले,प्रवीण भोसले,तानाजी भोसले,गटविकास अधिकारी प्रशांत काळे,बांधकाम विभाग उप अभियंता लवटे,शाखा अभियंता कांबळे,ग्रामसेवक शहाजी शेणवे सह ग्रामस्थ उपस्थित होते.