मुरगूड (प्रतिनिधी) : आदमापूर येथील श्री संत बाळुमामा मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल येथे शासन दराने २० ऑक्सिजन बेड कोव्हिड सेंटरचे उद्घाटन धैर्यशिलराजे भोसले, प्रांताधिकारी संपत्त खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वॉर्डचे उद्घाटन तालुका आरोग्याधिकारी सचिन इंचनाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम, संस्थान सेक्रटरी रावसाहेब कोणकेरी आणि आदमापुरचे सरपंच विजयराव गुरव यांनी दिपप्रज्वलन करुन श्रींच्या फोटोस पुष्पहार अर्पण केला. तसेच या हॉस्पिटलच्या कामकाजाची माहिती कार्याध्यांनी दिली. देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने अतिशय कमी वेळेत भागातील लोकांच्या आणि भक्तांच्या आरोग्य सेवेबद्दल प्रांताधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्यवस्थापक अशोक पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.