दिंडनेर्ली ( प्रतिनिधी ) : करवीर तालुक्यातील इस्पूर्ली येथील बस स्टॉप शेजारील असणाऱ्या अशोक टी स्टॉल व राजाभाऊ पान शॉप यामध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत युवराज चौगले आणि अतुल तांबेकर (रा. इस्पुली) या दोघांवरती अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल तांबेकर हा गुटखा विक्री करत असताना रंगेहात सापडला. त्यानंतर लगेच शेजारी असणाऱ्या अशोक टी स्टॉल या दुकानांवरती छापा टाकून त्यांच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी मसाला, तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.