इचलकरंजी (प्रतिनिधी) : चंदूर येथील नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. नराधमाला कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी चंदूर ग्रा.पं. सदस्य, चर्मकार समाज, मनसे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने इचलकरंजी येथील प्रांत कार्यालय व शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चात पं. स. चे माजी सभापती महेश पाटील, सरपंच अनिता माने, संदीप कांबळे, प्रशांत माने, ललिता पुजारी, वैशाली पाटील, भाऊसो रेंदाळे, संदीप जाधव आदी सहभागी झाले होते. निवेदन देताना कबनूरच्या सरपंच शोभा पोवार, रावसाहेब निर्मळे, नागेश शेजाळे, प्रदीप कांबळे, रोहिदास माने, अक्षय माने, डी. के. हंकारे, किरण माने आदी उपस्थित होते.

चंदूर येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी ऋत्विक शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मनसेच्या वतीने शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रवी गोंदकर, प्रताप पाटील, शहाजी भोसले, मनोज पाटील, नरेंद्र गोंदकर, महेश शेंडे, प्रगती पांढरपट्टी, हसीना माणगावे, पूजा लाखे, संगीता सुतार, लक्ष्मी बलारी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले. संबंधित आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने इचलकरंजी बार असोसिएशनकडे केली आहे. यावेळी बाळ महाराज, संतोष हत्तीकर, पंढरीनाथ ठाणेकर, जितेंद्र मस्कर, अनिकेत तानुगडे, सचिन कुरुंदवाडे, मारुती शिंगारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.