कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : लग्नात पाहुणा म्हणून यायचं आणि जेवणावर ताव मारून निघून जायचं ही पद्धत आपण जवळपास सगळ्यांस बघितली आहे .पण लग्नात पाहुणा म्हणून जायचं चक्क सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारायचा असा काहीसा प्रकार कोल्हापुरात घडला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मंगल कार्यालयामधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला या गुन्ह्यान विरोधक तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आलं होतं. या पथकाने मंगल कार्यातील चोरी संदर्भात तपास केला.
मिळालेल्या माहितीवरून लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला गुन्हा हा बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील राहणार आदमापुर तालुका भुदरगड या रेकॉर्डवरील चोरट्याने केल्या निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कोल्हापूर मधील लक्ष्मीपुरी जय पॅलेस कळंबा सुष्टी फार्म हाऊस हंबरवाडी येथे चोरी केली असलेली कबुली दिली आहे. त्याच्याकडून एकूण 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एकूण तीन लाख 78 हजार 470 रुपये असा मुद्देमात जप्त करण्यात आला असून यापूर्वी त्याच्यावर कोल्हापूर,पुणे जिल्ह्यामध्ये घरपोडी ,जबरी चोरीचे एकूण 21 गुन्हे दाखल असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.