कोल्हापूर (प्रतिनिधी) : हात धुवा मोहिम महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात आली असून, काल (गुरुवार) बी वॉर्डमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने हात धुवा मोहिमेची प्रात्यक्षिकासह जनजागृती करण्यात आली.
विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर यांनी बी वॉर्डामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने हात धुवा मोहिम राबविली. यावेळी प्रात्यक्षिके दाखवून या मोहिमेची जागृती करण्यात आली. यावेळी स्वच्छता दूत अमित देशपांडे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. हाताची स्वच्छता म्हणजे आजारापासून मुक्तता या घोषवाक्यानुसार कोरोनासह अन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी हात धुवा मोहिम उपयुक्त असून, ही मोहिम सातत्यपूर्ण ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.