मुंबई (प्रतिनिधी) : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे आज (रविवार)  पालघर येथे झालेल्या अपघातात मिस्त्री यांचे निधन झाले आहे. हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला.

दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पालघर येथील सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जागीच सायरस मिस्त्री त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीसांनी दिली आहे.

शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार असलेले सायर मिस्त्री यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१२ मध्ये त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून त्यांना हटवण्यात आले होते.