मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याआधीच वर्षा बंगला सोडला आहे. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे होते. यावेळी शिवसैनिकांनी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु केले आहे.