नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बाबत भारतात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आता टेस्लाचे सीईओ आणि जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम हॅक होऊ शकतात, असा दावा एलन मस्क यांनी केला आहे. तसेच evm अमेरिकन निवडणुकांमधून हटविले पाहिजे, असेही मस्क म्हणाले आहेत.

दरम्यान, मस्क यांनी त्यांच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. अमेरिकेने कागदी मतपत्रिकांवर मतदान घ्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत अनेक देशांमध्ये वाद सुरू आहेत. त्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारतातील निवडणुकांमध्येही ईव्हीएमचा वापर केला जातो. मात्र, ईव्हीएम सुरक्षित असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. तसेच evm मध्ये गडबड करणे अशक्य असल्याचेही म्हंटले आहे.


एलन मस्क काय म्हणाले?
“आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हटवली पाहिजेत,” असे मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. मानवाकडून किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका कमी असला तरीही तो खूप जास्त आहे.