दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अशा स्थितीत ज्या गोष्टी थंड असतात, त्या गोष्टी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. अशातच उन्हाळ्यात थंड गुणधर्म असणाऱ्या वस्तूंमध्ये दह्याचा देखील समावेश होतो.. सोबतच आपण निरोगीही राहतो. आज आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्याने आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात आणि आपण कोणत्या आजारांपासून दूर राहू शकतो.

दह्यामध्ये मोठ्याप्रमाणात पोषक तत्व असतात. दही हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. दह्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबे, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फॅटी ऍसिडस् यांसारखे पोषक घटक दह्यामध्ये आढळतात. या पोषक घटकांवरुन तुम्हाला कळालेच असेल की दही शरीरासाठी किती फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात दही खाल्याने होतात हे फायदे

  1. इम्युनिटी होईल मजबूत
    उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने इम्युनिटीला पहिला फायदा होतो. जर तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर तुमची इम्युनिटी मजबूत होईल
  2. मजबूत होतील हाडे
    याशिवाय दह्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. वास्तविक, दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते. अशाप्रकारे हाडांसोबतच दातही निरोगी बनवता येतात.
  3. वजन कमी करण्यात होईल मदत

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आजच आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा.
दह्यामध्ये प्रोटीन आढळतात. तसेच यात हेल्दी फॅट्स असतात.
उन्हाळ्यात रोज दह्याचे सेवन केल्यास वजन कमी करण्यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही मात करता येते.

  1. पचनसंस्था होईल मजबूत
    चौथा फायदा तुमच्या पचनसंस्थेला होईल. जर तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर ते पचनसंस्था देखील निरोगी ठेवू शकते.
    दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे अनेक फायदे होतात.

दही किती प्रमाणात सेवन करावे –

– उन्हाळ्यात व्यक्ती एक वाटी दह्याचे सेवन तुम्ही करू शकता. दह्याचे त्याचे प्रमाण व्यक्तीचे वय आणि आरोग्य यावर देखील अवलंबून असते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने दह्याचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

– दही तुम्ही गोड लस्सीच्या स्वरुपात सेवन करू शकता.

– ताक बनवूनही दह्याचे सेवन तुम्ही करु शकता.

– तुम्ही तुमच्या आहारात कढी, दही पापडी किंवा दही वडा या स्वरूपातही दह्याचे सेवन करु शकता.

– बटाटा रायता, बुंदी रायता, काकडी रायता, लौकीचा रायता इत्यादी रूपातही तुम्ही दही खाऊ शकता.