कुरुंदवाड (प्रतिनिधी) : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील वृद्धांची गेली १५ वर्षे विनामोबदला वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. राजीव जाधव यांचा आज (शुक्रवारी) डॉक्टर दिनानिमित्त वृद्धाश्रमाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वृद्धाश्रमाला सुरवातीपासूनच डॉ. जाधव यांचे सर्व प्रकारे सहकार्य मिळत आहे. शिवाय विनामोबदला वैद्यकीय सेवा देत असतात. त्यामुळे वृद्धाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी डॉ. जाधव यांना सल्लागार समिती संचालक म्हणून घेतले आहेत. डॉक्टर दिनानिमित्त वृद्धाश्रम चालक बाबासाहेब पुजारी, सल्लागार समिती सदस्य व उद्योजक राजन पदुशेरी यांनी डॉ. जाधव यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.