मुरगुड (प्रतिनिधी) : मुरगुड मध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेता प्रशासन यंत्रणेने कडक निर्बंध घातल्याने गोरगरीब ,कष्टकरी लोकांना त्याचा जबर फटका बसला आहे पण हे भयरुपी संकट थोपवण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. पण समाजातील गोरगरिबांची व्यथा ओळखुन मुरगुडमधील युवा उद्योजक नवनाथ सातवेकर युवा मंच च्या वतीने १०० गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दै. लोकमत चे मुरगुड प्रतिनिधी अनिल पाटील व नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी समाधान पोवार, अनिकेत नलवडे, संग्राम माडेकर,ओंकार म्हेतर,सुरज डेळेकर,किरण गुजर,समरजित चव्हाण,प्रमोद रामाणे व अथर्व चव्हाण आदि उपस्थित होते.