कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ अंतर्गत ताराबाई पार्क आणि न्यू शाहूपुरी परिसरात दीपाली घाटगे आणि त्यांच्या परिवाराने मोफत भाजी घरपोच केली. या उपक्रमाबाबत परिसरातील लोकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे भाजी मार्केट बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे शहरात भाजी टंचाई निर्माण झाल्यामुळे मिळेल त्या चढ्या दराने भाजी विकत घ्यावी लागत होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडत नव्हते. त्यामुऴे प्रभागातील नागरिकांना दीपाली घाटगे आणि त्यांच्या परिवाराने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकांना भाजी उपलब्ध करून देण्याचे ठरविले.

जवळपास १,५०० किलो ताजी आणि स्वच्छ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणून त्यांचे चांगल्या प्रकारे घरातच पॅकिंग केले. हे पॅकिंग ताराबाई पार्क आणि न्यु शाहूपुरी येथील ४०० कुटुंबांना घरोघरी जाऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून मोफत वाटप केले. कोरोनाच्या अडचणीच्या काळात जीवनोपयोगी वस्तू घरपोच मिळाल्यामुळे वंदूरकर घाटगे सरकार परिवाराचे प्रभागातील सर्व जनतेतून कौतुक होत आहे.