सुमित तांबेकर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरासह पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापला असून सांगलीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या अंतर्गत कलह अद्याप थांबायला तयार नाही. कारण आज विशाल पाटील यांनी अर्ज भरण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून, आम्हाला महाविकास आघाडीतून संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला असून ही संधी न मिळाल्यास ते बंडखोरीचे पाऊल उचलणार का ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाल पाटील यांनी नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आज सकाळी पोस्ट करत आईकडून औक्षण करून घेत मी पुन्हा एकदा एका परीक्षेला सामोरा जात आहे. त्यासाठी आईच्या आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी राहतील, स्वाभिमानीच्या या लढाईत मी नक्की यशस्वी होईल होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढे पाटील यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची साथ मला आहे असेही विधान त्यांनी या पोस्टमध्ये केले आहे सांगलीत आता काय होणार याकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागला आहे.

महाविकास आघाडीने सांगलीतील आपला उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी सांगली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वजीत कदम आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी स्व. श्री वसंत दादा पाटील यांचा नातू श्री विशाल दादा पाटील यांनी अद्याप आम्हाला उमेदवारी मिळेल याची शाश्वती असल्याचे विधान केले असल्याने या विधानामुळे महाविकास आघाडीतील पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये विधाने केली जात आहेत ज्याच्यामध्ये नाना पटोले उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही यावर आता बोलावे लागतय मात्र हा तिढा अद्याप संपलेला नाही त्यामुळे विशाल पाटील सांगलीतून बंडखोरी करणार का असा सवाल आता विचारला जात आहे.