धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड हे तुळशी-धामणी परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेले गाव. येथे शनिवारी आठवडा बाजार भरतो. मुख्य बाजारपेठ असल्याने प्लास्टिक पिशव्या, रबरी बाटल्या, कागद आणि इतर टाकावू वस्तू पडून परिसर अस्वच्छ झाला होता. हे लक्षात घेऊन तुळशी नदीच्या काठी सार्वजनिक घाट क्षेत्राच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ग्रामविकास अधिकारी एल एस इंगळे यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता स्वतः रिकाम्या जागेत नेऊन जाळून विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले. या वेळी उपसरपंच प्रशांत पोतदार, माजी उपसरपंच आनंदा जाधव, सदस्य सीताराम फडके आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.