कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील राजारामपुरी येथे असणाऱ्या महेंद्र ज्वेलर्समध्ये दिपावलीच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महिला वर्गाने पारंपारिक दागिन्यांबरोबरच अँटीक मंगळसूत्र नेकलेस, टॉप्स, अंगठी आदी दागिन्यांची खरेदी केल्या.

सोन्याच्या दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता यावर्षी कमीत कमी वजनामध्ये मोठे दिसणारे दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. त्याचबरोबर महेंद्र ज्वेलर्सची खासियत असणाऱ्या जास्त वजनामधील डिझाईजर अलंकारांचे कलेक्शन ही या ठिकाणी पहावयास मिळाले. तसेच या दुकानात सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर १० टक्के सूट आणि आयजीआय सर्टिफाईड हिऱ्यांच्या दरामध्ये १५ टक्के सूट अशा ग्राहक हिताच्या योजनांचा लाभ घेउन दागिने खरेदी केल्याबद्दल महेंट ज्वेलर्सच्या वतीने सर्व ग्राहकांचे आभार मानण्यात आले.