कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कायमस्वरुपी सहाय्यक संचालक नगर रचना (ADTP) नेमण्यात पुढाकार घेतल्याबद्दल कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे क्रिडाई कोल्हापूरतर्फे अभिनंदन करण्यात आले.

त्यावेळी विकास आराखड्यावर पूर रेषांची अंमलबजावणी लवकर करण्यासाठी, तसेच प्राधिकरण आणि विकास आराखड्यासाठी पूर्ण स्टाफची नेमणूक करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवळापूरकर, सचिव रविकिशोर माने, सचिन ओसवाल, श्रीधर कुलकर्णी, चेतन चव्हाण, प्रदिप भारमल, गौतम परमार, प्रमोद साळुंखे आदी उपस्थित होते.