कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी मूर्तीला इरले पाघरण्यात आले असून उत्सवमूर्ती महासरस्वतीच्या बाजूला ठेवण्यात आली होती.
नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने श्री अंबाबाई मंदिरात उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आज (सोमवार) गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये कोरोनामुळे भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे.