चंदगड (प्रतिनिधी) : मुश्रीफ, जयंतराव आणि अजितदादांना दिवसातून अनेक वेळा माझे नाव काढल्याशिवाय झोप लागत नाही. मी पुणे पदवीधर मतदारसंघात काय काम केले, हे जनतेला माहीत आहे. मला मुश्रीफ अथवा इतर कोणाला ते सांगायची गरज नाही असा प्रतिटोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला. ते आज (मंगळवार) चंदगड येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचार दौरा व नियोजन बैठकीत बोलत होते.

या वेळी चंद्रकांतदादा यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सूचना दिल्या. पुणे पदवीधर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो शाबूत ठेवायलाच हवा. विरोधक माझ्यावर अनेक चुकीचे आरोप करत आहेत. मुश्रीफ, जयंत पाटील आणि अजितदादांना दिवसातून अनेक वेळा माझे नाव काढल्याशिवाय झोप लागत नाही. मी काय काम केले आहे, हे जनतेला माहीत आहे. मला मुश्रीफ अथवा इतर कोणाला ते सांगायची गरज नाही, असा प्रतिटोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.

या वेळी भरमूअण्णा पाटील, गोपाळ पाटील, शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून मुंगेरी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नांदवडेकर, महिला अध्यक्ष काणेकर, शांताराम पाटील, उपाध्यक्ष नितिन फाटक, गोविंद पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.