पंढरपूर ( प्रतिनिधी ) कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे भाविकांसाठी सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थ युवा फाउंडेशन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसेच कैवल्य वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, कार्तिकी वारी २०२३ च्या निमित्ताने समर्थ युवा फाउंडेशन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसेच कैवल्य वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूरमधील पत्राशेड गोपाळपूर मार्ग येथे दि. २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान मेडिकल चेकअप, मोबाईल व्हॅन व आरोग्य तपासण्या या सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत.

यामध्ये रक्तातील साखर तपासणी ( ब्लड शुगर), रक्तदाब तपासणी (बी.पी), छातीचा एक्स – रे, रक्त तपासणी – सीबीसी टेस्ट, कोलेस्ट्रॉल तपासणी, स्तन कॅन्सर तपासणी – मॅमोग्राफी या आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जातील. तरी, या शिबीराचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.