कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धंनजय महाडिक देखील उपस्थित होते.

सर्व कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचंड ताकदीने मेहनत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणूया तसेच NDA च्या 400 जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया असा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.

यावेळी संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे, राजेश पाटील, जयंत पाटील, अमल महाडिक, शौमिका महाडिक, महेश जाधव, सत्यजित नाना कदम, बाबासाहेब पाटील, विजय जाधव, आदिल फरास, सुजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.