कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. गेली सात वर्षे फक्त इव्हेंट व इमेज मॅनेजमेंट यामध्ये सरकार अडकून पडल्याने सर्वसामान्य माणूस संकटाच्या गर्तेत सापडला आहे. मोदी सरकारच्या सात वर्षातील काळ्या कारभाराचा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.

मोदी सरकारच्या या कारभारा विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नियोजनानुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खालील मुद्दे मांडले

1) नोटबंदी

2) शेतकरी आणि कृषी कायदे लादले

3) वस्तू आणि सेवा कर (Goods and Service tax (GST))

4) विविध जागतिक निर्देशांकात भारताचे घसरलेले स्थान

5) कोरोना महामारी वस्तुस्थिती

कोरोना पहिली लाट

  • राज्य सरकारांना विश्वासात न घेता आणि काहीही नियोजन न करता अचानक संपूर्ण देशात lockdown लावला गेला.
  • या महामारीच्या काळातही आरोग्य व्यवस्था बळकट करण्याऐवजी टाळ्या, थाळ्या आणि दिवे लावणे अशा इव्हेंट मध्ये मोदी सरकार व्यस्त राहिले.
  • सुरवातीला वारंवार lockdown मध्ये जनतेसमोर येऊन भाषण करणारे पंतप्रधान मोदी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर राज्य सरकारांवर जबाबदारी टाकून जनतेसमोर येईनासे झाले.

कोरोना दुसरी लाट

  • आपण कोरोनावर विजय मिळवला असे मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीर करून टाकले.
  • इतर सर्व देशात कोरोनाची दुसरी लाट आली तरी भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही या भ्रमात मोदी सरकार राहिले.
  • कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही मोदी सरकार बेफिकीर राहिले.
  • कोणतीही पूर्वतयारी न केल्याने संपूर्ण देशभर ऑक्सिजनची आणि रेमिडीसिव्हीर सारख्या औषधांची कमतरता आणि वितरण व्यवस्थेचा गोंधळ निर्माण झाला. ऑक्सिजन अभावी हजारो लोकांना प्राण गमवावे लागले.

6 ) कोरोना लस कमतरता

7) अर्थव्यवस्थेचे नुकसान

8 ) ज्ञानी आणि तज्ञ लोक यांची नेहमीच अहवेलना करण्यात आली

लोकांना केवळ आच्छे दिन चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींनी देशाला खूप मागे नेले आहे. त्यामुळे मोदी है तो मुमकिन है नाही तर ‘मोदी है तो सब नामुमकिन है’. अशी आता परिस्थिती आहे..

या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील,आमदार पी एन पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लानी , सचिन चव्हाण, किशोर खानविलकर,संपतराव पाटील, दिपक थोरात,पार्थ मुंडे,बाळासाहेब खाडे,अक्षय शेळके,उदय पोवार, सरफराज रिकीबदार, प्रवीण पाटील,संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी,मंगल खुडे,पूजा आरडे, उज्वला चौगले,वैशाली पाडेकर यांच्यासह  काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.