ईडीचे सर्व अधिकार अबाधित, ‘ती’ याचिका फेटाळली

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे ईडीला मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए कायद्यात झालेले बदल योग्य असून, या कायद्यातंर्गत गुन्हा करून जमवलेली संपत्ती, त्याचा शोध घेणे, संपत्ती जप्त करणे, आरोपींना अटक करणे आदी कारवाई योग्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. प्रिव्हेन्शन… Continue reading ईडीचे सर्व अधिकार अबाधित, ‘ती’ याचिका फेटाळली

राज्यसभेतील १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे मंगळवार राज्यसभेतील १९ खासदारांना आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी (दि. २५) काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. खासदारांना सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्यामुळे आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेत विरोधक सातत्याने… Continue reading राज्यसभेतील १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित

ठाकरे गटाला दिलासा; शिवसेना कुणाची, १ ऑगस्टला फैसला.

(नवी दिल्ली) : न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे, असे शिवसेनेने म्हटले होते. आता याप्रकरणावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालायने परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्ट रोजी इतर याचिकांसह या मागणीवरही सुनावणी होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही दावा केला आहे. त्यामुळे धनुष्यबाण… Continue reading ठाकरे गटाला दिलासा; शिवसेना कुणाची, १ ऑगस्टला फैसला.

सोनिया गांधी यांची पुन्हा ईडीमार्फत चौकशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज (मंगळवार) दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. या चौकशी विरोधात काँग्रेसच्या वतीने राजधानी दिल्लीसह देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. या सर्वामध्ये पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय चौकात एकटेच आंदोलनाला बसलेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी… Continue reading सोनिया गांधी यांची पुन्हा ईडीमार्फत चौकशी

गुजरातमध्ये विषारी दारुमुळे २५ जणांचा मृत्यू

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : राज्यात दारुबंदी असतानाही गुजरातमध्ये विषारी दारुमुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद शहरातली ही घटना आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात गावठी दारु बनवणाऱ्या १३ जणांना अटक करण्यात आली आहे. विषारी दारु प्यायल्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जणांना… Continue reading गुजरातमध्ये विषारी दारुमुळे २५ जणांचा मृत्यू

नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे. रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं… Continue reading नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

गोंधळ घालणारे काँग्रेसचे चार खासदार निलंबित

नवी दिल्ली: लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर आता लोकसभेचे कामकाज उद्या २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यापूर्वी सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या राजेंद्र… Continue reading गोंधळ घालणारे काँग्रेसचे चार खासदार निलंबित

राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विराजमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा झाला. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (सोमवारी) राष्ट्रपतीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा  यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत… Continue reading राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विराजमान

खा. महाडिक यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू कार्यभार स्वीकारणार आहेत. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणूनही मुर्मू यांचे वेगळेपण आहे. राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच नवी दिल्लीत नवनिर्वाचित राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू उल्लेखनीय कामगिरी करतील. विशेषतः आदिवासी आणि वंचित समाजाच्या विकासासाठी राष्ट्रपतींचे… Continue reading खा. महाडिक यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा

‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदा ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या भूमिका असेलल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा, तर राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.… Continue reading ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

error: Content is protected !!